बाळासाहेब ठाकरेंनाही 'भारतरत्न' द्या : शिवसेना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी झी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. बाळासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी तरुणीपणी जसा नाचत होतो तसा आता नाचेल, असेही जोशी यांनी उत्साहात सांगितले.

Updated: Dec 24, 2014, 08:07 PM IST
बाळासाहेब ठाकरेंनाही 'भारतरत्न' द्या : शिवसेना title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी झी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. बाळासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी तरुणीपणी जसा नाचत होतो तसा आता नाचेल, असेही जोशी यांनी उत्साहात सांगितले.

राष्ट्रपतींनी आजच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना यंदाचा भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. यानंतर आता शिवसेनेने बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

शिवसेना आणि भाजप हे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचं कार्य जसं महान आहे, तसंच बाळासाहेबांचंही कर्तृत्व अनमोल आहे, त्यामुळे त्यांनाही ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

बाळासाहेबांनी गरिबांसाठी केलेलं कार्य मोठं आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सन्मानाने त्यांचा गौरव व्हावा, असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये कार्य करणाऱ्या नेत्यांसाठी ‘भारतरत्न’ची मागणी होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांनाही ‘भारतरत्न’ मिळावा अशी मागणी करण्यात गैर काय असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मागणीची योग्य दखल घेतील असा विश्वासही जोशींनी व्यक्त केला.

दरम्यान, भारत रत्न मिळावा यासाठी मोठी यादी आहे. बाळासाहेबांचेही काम मोठे आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.