कवी शंकर वैद्य यांचे मुंबईत ८६ व्या वर्षी निधन

 कवी शंकर वैद्य यांचे आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. सुषुश्रा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Updated: Sep 23, 2014, 09:24 AM IST
कवी शंकर वैद्य यांचे मुंबईत ८६ व्या वर्षी निधन title=

मुंबई : कवी शंकर वैद्य यांचे आज सकाळी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. सुषुश्रा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ चा. त्यांचं बालपण गेलं ते ओतूर या गावी. त्यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. त्यांचे घरही मोठे होते. त्यांचे घर अडीच मजली, सात खणीचे होते. घराभोवती कडुनिंब, चिंच, कवठी, बोरी, प्राजक्त आदींची झाडे होते.  झाडाफुलांच्या या सहवासात शंकर वैद्यांचं बालपण आणि किशोरपणीचा काळ गेला. 

बालपण निसर्ग सानिध्यात गेल्याने निसर्गच त्यांच्या कवितांना पोषक ठरला. ओतूर सोडून १९४१ साली माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता ते जुन्नरला आले. जुन्नरचं वातावरण एकदम वेगळं. एकदा बालदिनी पोवाडे म्हणण्याचं काम छोटय़ा शंकरकडे आले. त्यावेळी कौतुक म्हणून कवितांचं पुस्तक त्यांना बक्षीस मिळालं. त्यांना खूप आनंद झाला. त्यातल्या कविता आंतरिक ओढीनं त्यांनी वाचल्या. त्यातून त्यांना कवितेची आवड निर्माण झाली. 

१९४६ साली शंकर वैद्य मॅट्रिक झाले आणि ओतूर-जुन्नर सोडून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यांनी साहित्याच्या एका नव्या सृष्टीत त्यांनी प्रवेश केला होता. पुण्यात शिकत असतानाच शेतकी खात्यात त्यांनी सात वर्षे नोकरी केली.  पुणे विद्यापीठात बी. ए. आणि एम. ए. परीक्षेत मराठी विभागात प्रथम आल्याबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती.

शंकर वैद्यांचा पहिला कवितासंग्रह 'कालस्वर'. त्यानंतर २७ वर्षांनी 'दर्शन' हा आला.  एका आंतरिक ऊर्मीने शंकर वैद्यांनी कवितालेखन केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.