वरिष्ठांकडून मानसिक छळ व्हायचा, शिर्केंच्या कुटुंबियांचा आरोप

वाकोला पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर दिलीप शिर्केंनी केलेला गोळीबार आणि त्यात सीनिअर इन्स्पेक्टर विलास जोशींचा झालेला मृत्यू यामुळं पोलीस दल पुरतं हादरलंय. 

Updated: May 4, 2015, 11:26 PM IST
वरिष्ठांकडून मानसिक छळ व्हायचा, शिर्केंच्या कुटुंबियांचा आरोप title=

मुंबई: वाकोला पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर दिलीप शिर्केंनी केलेला गोळीबार आणि त्यात सीनिअर इन्स्पेक्टर विलास जोशींचा झालेला मृत्यू यामुळं पोलीस दल पुरतं हादरलंय. 

या घटनेमुळं शिर्के कुटुंबीय देखील हवालदिल झालेत. या गोळीबारामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिर्केंना हीन दर्जाची वागणूक मिळत होती, असा आरोप दिलीप शिर्केंची पत्नी दीप्ती शिर्के यांनी केलाय. 

तर बाबांचा मानसिक छळ होत असल्यानं ते तणावाखाली होते, असं त्यांचा मुलगा अभिषेक शिर्केनं सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.