दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि सुभाष देसाई यांनी आज शिष्टमंडळासह 

Updated: Jun 16, 2015, 03:01 PM IST
दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि सुभाष देसाई यांनी आज शिष्टमंडळासह 

मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मेट्रो ३ प्रोजेक्टमुळं दादरमधील एकाही रहिवाशाला घर सोडून जावं लागणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहिवाशांना दिलंय.

तसंच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. 

वेळप्रसंगी मेट्रो ३ प्रोजेक्टच्या आराखड्यात बदल करू पण एकही रहिवाशी बाधित होणार नाही याची काळजी घेवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.