प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे

दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

Updated: Jun 16, 2015, 02:41 PM IST
प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यासाठी मेट्रो बांधाली जातेय. पण त्याची कुऱ्हाड मराठी माणसावर कोसळणार आहे. शिवाय शिवसेना सत्तेत आहे, त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा प्रकल्प रद्द करावा असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी हाणलाय. 

मेट्रो ३ या प्रस्तावित प्रकल्पासाठी दादरमधील काही रहिवाशांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या रहिवाशांची बाजू घेत पुन्हा एकदा मेट्रो ३ ला विरोध दर्शवला. 

राज ठाकरे म्हणाले, आरे, गिरगाव आणि आता दादर, मराठी माणूस आहे तिथंच प्रकल्प राबवले जात असून महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्यासाठी हा षडयंत्र रचला जात आहे. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करु असं मुख्यमंत्री सांगत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही असंही त्यांनी नमूद केलं. मुंबईकरांना अशा प्रकल्पांची गरज नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुरु केलेले प्रकल्पच पुढं न्यायचे असतील तर भाजपा सत्तेवर का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.