पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद

 महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व्यापारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. व्हॅटचे दर कमी करणे आणि समान एलबीटी लागू करण्याच्या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून व्यापारी हे आंदोलन करणार आहेत. 

Updated: Aug 22, 2014, 10:00 PM IST
पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद title=

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व्यापारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. व्हॅटचे दर कमी करणे आणि समान एलबीटी लागू करण्याच्या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून व्यापारी हे आंदोलन करणार आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी), स्टेट स्पेसिफिक कॉस्ट (एसएससी) आणि व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे.

या मागण्या पूर्ण केल्यास राज्यातील वाहनचालकांसाठी पेट्रोलचे दर 5 ते 6 रुपयांनी कमी होतील, असा दावाही फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन या पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेने केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.