शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू, आतापर्यंत काय घडलंय ?

शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे ४ फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलंय. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकणात काय घडलंय, त्याचा हा वेध. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू आहेत.

Updated: Aug 28, 2015, 10:17 PM IST
शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू, आतापर्यंत काय घडलंय ? title=

मुंबई : शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे ४ फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलंय. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकणात काय घडलंय, त्याचा हा वेध. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू आहेत.

हत्येचं कारण काय?

अँगल 1 - सावत्र भावाशी विवाहाचा आग्रह

अँगल 2 - शीनाकडे असलेला इंद्राणीचा 'काळा पैसा'

अधिक वाचा : नात्यांची गुंतागुंत वाढली : शीना-मिखाईलचे वडीलही वेगवेगळे?

हत्या कशी झाली?

अँगल 1 - गुंगीचं इंजिक्शन देऊन गळा दाबण्यात आला

अँगल 2 - शीनाला भरपूर दारू पाजून गळा दाबला

कोण काय म्हणतंय?

इंद्राणी मुखर्जी 
- माझा दुसरा पती (संजीव खन्ना) यानं शीनाला मारलं. मी मारलं नाही. 

अधिक वाचा : शीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास

संजीव खन्ना 
- मी झोपलो होतो. जाग आली तेव्हा शीनाचा खून झाला होता. 

शाम राय, इंद्राणीचा ड्रायव्हर 
- सावत्र भाऊ राहुल याच्याशी शीनाचे संबंध न पटल्यामुळे इंद्राणीनं हा खुन केला. 

पीटर मुखर्जी, इंद्राणीचे सध्याचे पती 
- आधी आपल्याला शीना इंद्राणीची मुलगी आहे, हे माहिती नव्हतं असं सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनी जबाब फिरवला. राहुलनं याबाबत सांगितलं होतं, पण आपण इंद्राणीवर विश्वास ठेवला, असं ते म्हणतायत. 

राहुल मुखर्जी, पीटरचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा 
- शीनाचे आणि आपले संबंध इंद्राणीला मान्य नव्हते. शीना अमेरिकेत गेल्याचं सांगण्यात आलं होतं. 

मिखाईल बोरा, शीनाचा सख्खा भाऊ 
- इंद्राणीच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा. इंद्राणीनंच आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप. 

पोलीस तपासाचं काय?

1. मिखाईलकडचे पुरावे तपासले जाणार. त्या आधारे इंद्राणी, पीटरची चौकशी होणार 

2. पीटर मुखर्जींच्या जबाबामधला परस्पर-विरोध तपासला जाणार 

3. पेण पोलिसांनी पाठवलेल्या हाडांची DNA चाचणी, अहवालाची प्रतीक्षा

अधिक वाचा : हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास

4. मुंबई पोलीस, फोरेन्सिक तज्ज्ञ पेणमध्ये, मृतदेह आढळला त्या ठिकाणी तपास

5. ड्रायव्हर शाम राय 'माफीचा साक्षीदार' होण्याची शक्यता

दरम्यान, शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यामधले सर्व कॅरेक्टर्स आज मुंबईत येतायत. इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर शाम राय अटकेत आहेत... इंद्राणीचे पती मीडिया टायकून पीटर मुखर्जीही मुंबईतच आहेत. या तिघांची पोलिसांनी चौकशीही केलीये... आता  शीनाचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं गेलंय.  या हत्येच्या कटात सक्रीय सहभागी असलेला इंद्राणीचा क्रमांक दोनचा पती संजीव खन्ना यांना कोलकात्याहून मुंबईत आणलं जातंय. आता इंद्राणी, ड्रायव्हर आणि खन्ना या तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. राहुल मुखर्जीदेखील आज पहाटेच खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय. त्याच्यासह पीटर मुखर्जींचीही आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.