मुंबई : शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची भाषा करता करता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानं दिलेल्या जबाबामध्ये अनेक बाबी या परस्परविसंगत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार आहे.
अधिक वाचा - संजीव खन्नानं दिली 'हत्ये'ची कबुली; शीनाच्या मृतदेहाचे अवशेष 'डीएनए' टेस्टसाठी!
मिखाईलच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2012ला त्याला मुंबईत बोलावण्यात आलं होतं.. ज्या दिवशी शीनाची हत्या झाली त्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिल 2012ला त्याला मुंबईत संजीव खन्ना आणि इंद्राणी या दोघांनी धोक्यानं बेशुद्ध केलं.. शीनाचा खून केल्यानंतर इंद्राणी आणि संजीव त्याचाही काटा काढणार होते. मात्र त्याला शुद्ध आल्यामुळे तो वेळीच पळून गेला.
मात्र मिखाइलनं सांगितलेल्या या कथेत अनेक लूप होल्स आहेत. मिखाईल कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला तर त्यानं मुंबई किंवा गुवाहाटी पोलिसांमध्ये तेव्हाच तक्रार का दाखल केली नाही?
अधिक वाचा : Shocking! इंद्राणी आणि तिच्या वडिलांचे शारिरीक संबंधातून जन्माला आली शीना?
इतकं सगळं झाल्यानंतरही जेव्हा शीना बेपत्ता झाली तेव्हा मिखाईलला तिचं काही बरी वाईट झालं तर नसेल ना अशी शंका का आली नाही?
निदान बहीण सापडत नसल्याचं लक्षात आल्यावर तरी त्यानं पोलिसांशी का संपर्क केला नाही?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिखाईल या सगळ्या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. मात्र पोलिसांना या गोष्टीचा तपास करायचाय की. मिखाईलकडे शीनाचा मेल, फेसबुक आणि लिंक्डइन अकांऊटचा पासवर्ड होता का? या सर्वांचा वापर त्यानं 24 एप्रिल 2012नंतर कधी केला का?
अधिक वाचा : शीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास
जर त्यानं या पासवर्ड आणि अकाउंटचा वापर केला असेल तर तो इंद्राणीच्या सांगण्यावरुन केला की आणखी कोणाच्या सांगण्यावरुन? या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मिखाईलनं सांगितलेली गोष्ट आणि केलेले आरोप यांचा सुद्धा योग्य तपास होणं अत्यंत गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.