मध्य रेल्वेची नवी सुविधा, अडचणीची घोषणा डब्यातच

मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांना अनेकदा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी प्रवाशांना कळविण्यासाठी आता लोकल डब्यातच त्याची घोषणा केली जाणार आहे. 

Updated: Aug 29, 2015, 11:14 PM IST
मध्य रेल्वेची नवी सुविधा, अडचणीची घोषणा डब्यातच title=

मुंबई : मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांना अनेकदा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी प्रवाशांना कळविण्यासाठी आता लोकल डब्यातच त्याची घोषणा केली जाणार आहे. 

पश्चिम रेल्वेमध्ये कोणत्याही अडचणींची घोषणा तात्काळ केली जाते. त्याच धर्तीवर आता मध्य रेल्वेनेही हा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये यापूर्वीच स्पीकर्स बसवण्यात आले होते. मात्र, त्याचा वापर स्टेशन्सची माहिती देण्यासाठीच केला जातो. 

अचानक आलेल्या अडचणींमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याच मध्य रेल्वेने सांगितलय. पुढील आठवड्यापासून लोकल गाड्यांमध्ये गार्डकडून अशा घोषणा करण्यात येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.