चूक निवडणूक आयोगाची, फटका महिला मतदाराला

मुंबई महापालिका निवडणुकीत  मुंबईत मतदान सुरु असताना अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत तर एक वेगळाच घोळ मानखुर्द येथे पाहायला मिळाला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2017, 07:57 AM IST
चूक निवडणूक आयोगाची, फटका महिला मतदाराला title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत  मुंबईत मतदान सुरु असताना अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत तर एक वेगळाच घोळ मानखुर्द येथे पाहायला मिळाला आहे. 

मानखुर्द येथे राहणाऱ्या कौशल्या ईरकर यांना आपल्या मतदार यादीतील फोटो पाहून धक्काच बसला आपल्या नावासमोर फोटो वेगळ्याच व्यक्तीचा आहे त्यामुळे मतदानापासून अनेकांना वंचित राहावे लागत आहेत .

मानखुर्द च्या कौशल्या इरकर या महिलेचं मतदान ओळख पत्र आहे.त्यांच्या या ओळख पत्रावर त्यांचा फोटो न छापता बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो छापण्यात आला आहे.त्यामुळे या महिलेला मतदान करता आले नाही.

याबाबत त्यांनी  निवडणूक अधिकाऱयांन कडे विचारणा केली असता त्यांनी असमर्थता दर्शवल्याने कौशल्यं ईरकरांना मतदान न करताच माघारी फिरावे लागले आहे, लोकशाहीतील आपला अधिकार हिरावून घेतल्या बद्धल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

मुंबईत सर्वत्र उत्साहानं मतदान सुरू असले तरी ब-याच ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. त्यामुळं जे मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत, ते सर्व मतदार संतप्त झाले आहेत. 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीमध्ये तसंच वेबसाईटवर मतदारांची नावे मिळत असले तरी मतदान केंद्रावरील यादीमध्ये बऱ्याच जणांची नावे नाहीत. कफ परेड येथील जी डी सोमाणी शाळेतील मतदान केंद्रावर चर शेकडो जणांची नावे यादीतून गायब झाली असल्यानं राजकीय पक्षांचे उमेदवार चिंतेत आहेत. याठिकाणी तर नावे शोधण्यासाठी वेगळी रांग लावण्यात आली आहे.