'महाराष्ट्राच्या विकासात कच्छींचा मोठा हातभार' - पवार

कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासात देखील कच्छी बांधवांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोउद्घार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार बुधवारी दादरच्या योगी सभागृहात कच्छ शक्ती मासिकाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.

Updated: Jun 19, 2015, 07:12 PM IST
'महाराष्ट्राच्या विकासात कच्छींचा मोठा हातभार' - पवार title=

मुंबई : कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासात देखील कच्छी बांधवांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोउद्घार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार बुधवारी दादरच्या योगी सभागृहात कच्छ शक्ती मासिकाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.

कच्छी समाजाचं कौतुक करतांना पवार म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा कच्छी माणूस आहे. कोणत्याही परिस्थितीत तो आपला समाज, गाव, राज्य यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आज कच्छ रणाच्या बाहेर येऊन कच्छ बांधवानी मोठे यश मिळवले आहे. 

या कार्यक्रम प्रसंगी खा.शरद पवार यांच्या हस्ते नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी पवार म्हणाले, कच्छ शक्ती माध्यमातून संपादक हेमराज शाह यांनी समाज विधायक पत्रकारिता केली आहे. ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत .शाह यांनी कच्छ-गुजरात आणि महाराष्ट्राच्या एकतेसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.