www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर रेल्वेस्टेशनवर अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला येत्या पंधरा दिवसांमध्ये कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मोनिकाच्या वैद्यकीय चाचण्या केईएममध्ये सुरू आहेत. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिका लिहू शकणार आहे, तसंच टायपिंगही करु शकणार आहे.
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावले. 11 जानेवारीला हा अपघात घडला. कुर्ल्याच्या नेहरुनगर भागात राहणारी मोनिका 11 जानेवारीला दुपारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल पकडताना हात घसरून खाली पडली होती. तिला सुरुवातीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
अवयव तुटलेल्या रुग्णांवर वेळेवर हाडांची जुळवाजुळव करण्यासाठी ठराविक काळात शस्त्रक्रिया करावी लागते. पण मोनिकाला हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाला. तिच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी तिला तिचे दोन्ही हात गमवावे लागलेत... घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये घडलेला हा प्रसंग दुर्देवी होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.