मुंबई : राहुल बजाज यांच्या तयार असलेल्या ७० हजार रिक्षा विकण्यासाठी घाई गडबडीत ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने हे परप्रांतीयांना दिले जात आहेत, त्यामुळे अशा रिक्षा रस्त्यावर आल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि जाळा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज दहा वर्ष पूर्ण झाली. या निमित्त षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी काही ठराविक मुद्यांना हात घातला.
- ७० हजार रिक्षा परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने परप्रांतीयांना - राज ठाकरे
- १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला तात्काळ देण्याची गरज नाही, अशी अट ठेवण्यात आली. वाटेल तेव्हा ही वास्तव्याचा दाखला जमा करा, काही आढळल्यास परवाना रद्द करा. -
- ७० हजार रिक्षा परवाने देण्याची घाई काय, मुख्यमंत्री साहेब - राज ठाकरे
- राहुल बजाज यांच्या ७० हजार रिक्षा खपविण्यासाठी हा निर्णय - राज ठाकरे
- ११९० कोटी रुपयांचा व्यवहार होणार, त्याचं किक बॅक किती असेल - राज ठाकरे
- काय फरक आहे तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये - राज ठाकरे
- या खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहे - राज ठाकरे
- मराठीचा पुळका कशासाठी - राज ठाकरे
- ७० हजार परवाने मराठी मुलं आणि मुलांना द्याला पाहिजे होते - राज ठाकरे
- नवीन परवाने, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा जाळायच्या - राज ठाकरे
- मनसेमुळे १४ मराठी मुलांना लागली नोकरी - राज ठाकरे
- नव्या रिक्षा जाळून टाका - राज ठाकरे
- प्रवाशांना उतरवा आणि रिक्षा जाळा - राज ठाकरे
- नव्या येणाऱ्या रिक्षा, मी सांगतो आहे, नाही तर बिल मागतो बिल म्हणून जाळाल... - राज ठाकरे
- आजोबांनी सांगितले होतं एक तर हात जोडून किंवा हात सोडून काम करायचे - राज ठाकरे