अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: ७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना विशेष मोक्का न्यायालय येत्या ३० सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आज न्यायालयात १२ पैकी ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी केलीय. तर उर्वरित ४ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी विशेष मोक्का कोर्टात केलीय.
आणखी वाचा - ७/११ च्या बॉम्बस्फोटप्रकरणाच्या निकालाची आज शक्यता
आज दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपला असून न्यायालायाने ७/११ साखळी बॉम्बस्फोटाचा खटला राखून ठेवत येत्या ३० सप्टेंबर रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवलाय.
पाहा कोणत्या ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय आणि का?
आरोपी नंबर १ - कमाल अहमद मोहम्मद वकील अंसारी
आरोप: पाकिस्तानी दहशतवाद्यांना नेपाळच्या रस्त्यानं मुंबईत आणलं. स्फोटकांचा बंदोबस्त केला. मांटूगा रोड रेल्वे स्टेशनवर झालेला स्फोट यानं केला होता. पाकिस्तानात जावून दहशतवाद्यांचं ट्रेनिंग घेतलं होतं.
आरोपी नंबर २ - डॉ. तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अंसारी
आरोप: पाकिस्तानात जावून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं. मोहम्मद फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये मुख्य सहभाग घेतला होता. मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब तयार करायला मदत केली होती.
आरोपी नंबर ३ - मोहम्मद फैजल अताउर रेहमान शेख
आरोप: पाकिस्तानात जावून दोन वेळा दशतवादाचं ट्रेनिंग घेतलं. नविन मुलांना दहशतवादाच्या ट्रेनिंग करता पाकिस्तानात पाठवलं. आपल्या घरातच कट रचला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली. हवाला मार्गे पैशांची देवाण घेवाण केली. मोहम्मद फैजलच्या घरी असलेल्या मीटिंगमध्ये सहभाग घेतला. जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर रेलवेत स्फोट झाला होता, तो बॉम्ब यानं प्लांट केला होता.
आरोपी नंबर ४ - एतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी
आरोप: फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये सहभाग झाला होता. लोकल ट्रेनचा सर्वे केला होता. महाराष्ट्रात सिमीचा सहसचिव होता. मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब तयार करण्यात मदत केली होती. मिरारोड इथं रेल्वेत जो बॉम्बस्फोट झाला होता, तो बॉम्ब यानं प्लांट केला होता. तर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांची मुंब्रा इथं राहण्याची सोय केली होती.
आरोपी नंबर ६ - शेख मोहम्मद अली आलम शेख
आरोप: पाकिस्तानात जावून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं. आपल्याच घरात बॉम्ब तयार केला होता.
आरोपी नंबर ७ - मोहम्मद साजिद मगरब अंसारी
आरोप: बॉम्ब तयार करण्यासाठी टायमर सॉकेट तयार केलं होतं.
आरोपी नंबर १२ - नावीद हुसेन खान/राशीद हुसेन खान
आरोप: गोवंडी इथून वांद्र्याला गेला आणि खार इथं ट्रेनमध्ये बॉम्ब प्लांट केला होता. तसंच इतरांना बॉम्ब बनवण्यात मदत केली होती.
आरोपी नंबर १३ - आसिफ खान बशीर खान
आरोप: फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये मुख्य सहभाग घेतला होता. बोरीवली रेल्वे स्टेशनवर रेल्वेत जो बॉम्बस्फोट झाला होता, तो बॉम्ब यानं प्लांट केला होता.
या चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी
आरोपी नंबर ५ - मोहम्मद मजिद मोहम्मद शफी
आरोप: पाकिस्तानी दहशतवाद्यांना बांग्लादेश मार्गे मुंबईत आणलं आणि पुन्हा त्याच मार्गानं पाकिस्तानात पाठवलं.
आरोपी नंबर ९ - मुजम्मील अतउर रहमान शेख
आरोप: पाकिस्तानात जावून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं. फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये सहभाग घेतला होता आणि लोकल ट्रेनचा सर्वे केला होता.
आरोपी नंबर १० - शेख सोहेल मेहमूद शेख
आरोप: पाकिस्तानात जावून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं. फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये सहभाग घेतला होता आणि लोकल ट्रेनचा सर्वे केला होता.
आरोपी नंबर ११ - जमीर अहमद रेहमान शेख
आरोप: पाकिस्तानात जावून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं. फैजलच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये सहभाग घेतला होता आणि लोकल ट्रेनचा सर्वे केला होता.
निर्दोष सोडण्यात आलेला आरोपी
आरोपी नंबर ८ - अब्दुल वाहिद दीन मोहम्मद शेख
आरोप: आपल्या मुंब्राच्या घरी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना राहण्यास जागा दिली होती. पण आलेली माणसे ही पाकिस्तानातून आलेत आणि ते दहशतवादी आहेत याबाबत अब्दुल वाहिदला माहित नव्हतं. त्याला अंधारात ठेवण्यात आलं होतं. हे सुनावणी दरम्यान स्पष्ट झाल्यानं न्यायालयानं अब्दुल वाहिद दीन मोहम्मद शेखची निर्दोष मुक्तता केलीये.
आता या सर्व आरोपींना काय शिक्षा होते, ते ३० सप्टेंबरलाच कळेल.
आणखी वाचा - मुंबई साखळी बॉम्बस्फोट, १३ पैकी १२ आरोपी दोषी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.