मुंबई : दिल्लीत आप सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण होतात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला.
दिल्लीच्या राजकारणाच शेअर बाजारावर परिणाम दिसून येईल, अशी शक्यता होती. ही शक्यता नकारात्मक असेल, असे बोलले जात होते. भांडवली बाजार कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सेन्सेक्स आणि निफ्टीच्या या आश्चर्यजनक वाटचालीमुळे नवी आशा निर्माण होताना संभ्रम निर्माण झालाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे जाहीर झाल्यानंतर आप दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले. त्यामागोमाग भाजपला 4 जागांवर यश मिळण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला नवी दिल्लीसाठीच्या निवडणूक अंदाजात अपेक्षेप्रमाणे स्थान न मिळालेले पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांत नाराजी दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.