मुंबई : मंत्रालयातल्या कृषी विभागातले अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या विरोधात मंत्रालयातले कर्मचारी एकवटलेत.
सहाय यांच्याविरोधात मंत्रालय कर्मचा-यांमध्ये संताप आहे. वरिष्ठ अधिका-याच्या आठमुठेपणामुळे एका अधिका-याला आपला मुलगा गमवाला लागलाय.
मंत्रालयातील कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलानं फोन करून त्यांना घरी लवकर बोलावलं. घरी न आल्यास आत्महत्या करू अशी धमकीही मुलानं दिली. त्यामुळं घाडगे यांनी कृषी विभागातल्या साहाय यांच्य़ाकडून लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र या आयएएस दर्जाच्या आडमुठ्या अधिका-यानं घाडगेंना परवानगी नाकारली.
साडे पाच वाजता डयुटी संपल्याशिवाय घरी जाण्यास मज्जाव केला. अखेर घाडगे घरी न पोहचू शकल्यामुळं व्हायचे तेच झाले. त्यांच्या मुलानं आत्महत्या केली. शुक्रवारी हा संतापजनक प्रकार घडला. आता या भगवान सहाय यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष आहे.