मुंबई : शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचे आजपासून प्रयत्न सुरु होणार आहेत.. शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं गु-हाळ सुरु होतंय.. दहा कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे.. गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह आहे.. तर 4 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदांसाठी भाजप तयार आहे.. दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेची फेरी झाल्याचंही समजतंय..
शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी आजपासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान दुपारी एक वाजता मुंबईत आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक एकनाथ खडसे यांच्या घरी होणार आहे. संध्याकाळी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील मातोश्रीवर जातील अशी माहिती मिळतेय.
दोन्ही पक्षांमध्ये प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या चर्चेत जातीनं लक्ष घालणार आहेत, मात्र उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदाबाबत शिवसेना आग्रही असून, भाजप ही दोन्ही पदे शिवसेनेला देण्यास अनुत्सुक आहे. त्यामुळे आता तरी हा तिढा सुटणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.