www.24taas. com, झी मीडिया, मुंबई
जगभरात नावाजलेली सी ड्रिम हे लॅवीश जहाजाचं आज मुंबईत आगमन झालं. ९ मजल्याची हे अलीशान जहाज पहिल्यांदाच भारतात आलंय. ११२ विदेशी पर्यटकांना घेऊन जहाज मुंबई, गोवा आणि कोचीन असा प्रवास करणार आहे. या जहाजाचं उद्घाटन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. समुद्रातलं स्वप्न पूर्ण करणारं सी ड्रिम जहात पहिल्यांदाच भारतात दाखल झालं.
मुंबई, गोवा आणि कोचिन याठिकाणी इथल्या परदेशी पर्यटकांचा प्रवास होणर आहे. ९ मजल्यांचं हे राजेशाही क्रूझ जहाज भारतात आलंय. निळ्याशार महासागरात फिरताना आपल्याला हवा तसा हॉलिडे साजरा करण्याचा आनंद या क्रूझमध्ये मिळेल. अनेक देशांतल्या पर्यटनस्थळांना भेट देण्याची पर्वणी पर्यटकांना देणारं हे सी ड्रीम क्रूझ आता भारतीयांच्या भेटीला आलंय. एकावेळी ११२ पर्यटकांना सामावणारं, आणि प्रत्येक पर्यटकामागे एका क्रूझ मेंबरची सेवा देणारं गे लक्झरीयस जहाज.. या जहाजात लायब्ररीपासून ते कॅसिनोपर्यंतच्या सर्व सेवा आहेत. स्पा, योगा, गेमिंग, जीम, संगीत, लँड अडवेंचर इतकच नाही तर या जहाजात शॉपिंगही करता येते.
मात्र, या लॅवीश अशा जहाजात सुट्ट्यांची मजा लुटायची असेल तर मोठी किंमत मोजावी लागेल. एका व्यक्तीसाठी तब्बल 7 लाख रुपये खर्च करावा लागेल,. मुंबईत या जहाजाचं स्वागत केलं पर्यटनमंत्री छगन भूजबळ यांनी..या जहाजामुळे परदेशी पर्य़टक वाढणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला याचा फायादा होऊ शकणार आहे.
या अलीशान जहाजातून सर्वसामान्यांना फिरणं तसं कठिणच पण हे श्रीमंत जहाज आणि येणा-या परदेशी पर्यटकांसाठी तरी आपली पर्यटन स्थळ सुधरवली गेली तरी धीम्या गतीने का होईना पण या पर्यटनामार्फत राज्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होऊ शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.