www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विपश्यना साधनेचे प्रचारक सत्यनारायण गोयंका गुरूजी यांचे अंधेरीतील राहत्या घरी रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. भगवान गौतम बुद्धांच्या नंतर भारतातून लुप्त झालेली विपश्यना साधना गोयंका गुरुजींनी पुन्हा भारतात रूजवली.
गोयंका गुरुजींचा जन्म तत्कालीन ब्रह्मदेशातील. ऊ बा खिन यांच्याकडून ते विपश्यना शिकले. गुरुच्या आज्ञेनंतर १९६९ पासून भारतात त्यांनी विपश्यनेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. भारताबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये विपश्यना केंद्रे स्थापन करुन मानवी दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला समजण्याची आणि स्वत:ला बदलण्याची प्रक्रिया म्हणजे विपश्यना. श्वासावर मन केंद्रीत करुन मन आणि शरीरातील संवेदनांकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी गोयंका गुरूजींनी जगाला दिली.
सत्यनारायण गोयंका यांच्या निधनाने विपश्यनेचा प्रणेता हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गोयंका यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.