राज्याची तिजोरी कुरतडणारे उंदीर कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सरकारला आज अग्निपरीक्षेचा सामना करावा लागणार आहे, त्या आधी शिवसेनेने ‘सामना‘च्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे उंदराची म्हणण्यात आलंय. 

Updated: Nov 12, 2014, 12:41 PM IST
राज्याची तिजोरी कुरतडणारे उंदीर कोण? title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सरकारला आज अग्निपरीक्षेचा सामना करावा लागणार आहे, त्या आधी शिवसेनेने ‘सामना‘च्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे उंदराची म्हणण्यात आलंय. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने देऊ केलेल्या पाठिंब्याच्या मुद्यावरून सामनामध्ये शरसंधान साधले आहे. ‘महाराष्ट्राची तिजोरी कुरतडणाऱ्या उंदरांच्या पाठिंब्यावर राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची निवड तुम्ही करणार का,‘ असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

का ताणले गेले भाजप शिवसेनेचे संबंध
लोकसभा निवडणुकीनंतर जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने भाजपवर कडक शब्दांत टीका केली आहे. भाजपकडे 121 आमदार आहेत; तर बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. त्यातच, मंत्रिमंडळातील समावेशावरून आणि महत्त्वाच्या खात्यांच्या मागणीवरूनही दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरही हक्क सांगत भाजपवर दडपण आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

नैतिक आणि तात्विक मुद्दे कोणते?
नैतिकतेच्या आणि तात्त्विक मुद्यांवरून शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. हे नैतिक आणि तात्त्विक मुद्दे नेमके कोणते, हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले. 

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जहरी फणा- सामना
आमदारांच्या शपथविधीदरम्यान काही आमदारांनी ‘जय विदर्भ‘ अशी घोषणा दिली होती. शिवसेनेने त्यावरही टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ‘जय विदर्भ‘चा नारा देण्याची हिंमत वाढली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जहरी फणा काढून स्वतंत्र विदर्भाचे फुत्कार सोडण्याची हिंमत आतापर्यंत कोणी दाखवली नव्हती. भारताच्या संसदेमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद‘चे नारे देणे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असल्याचंही लेखात म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.