अपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

Updated: Feb 2, 2015, 04:04 PM IST
अपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस title=

मुंबई : काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.

सायंकाळी 6.39 वाजता: काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस

- पूर्ण प्रक्रिया होत असतांना कोणी पोल मागितला नाही - मुख्यमंत्री फडणवीस
- यापूर्वी अनेकांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला होता, ही काही पहिल्यांदा घडलेली घटना नाही - मुख्यमंत्री फडणवीस
- ज्यांना पोल मागायचा होता त्यांनी पोल मागितला नाही, काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत असल्याने ते पोल मागायला विसरले असावेत - मुख्यमंत्री फडणवीस
- संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण केला आहे - मुख्यमंत्री फडणवीस
- आम्ही विश्वासदर्शक ठरावला समोर जायला तयार आहोत , काँग्रेसने तो मांडावा - मुख्यमंत्री फडणवीस
- काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे - मुख्यमंत्री फडणवीस
- आम्ही बहुमत कधीही सिद्ध करू शकतो, ज्यांना वाटते त्यांनी अविश्वासदर्शक ठराव आणवा - मुख्यमंत्री फडणवीस
- NCP चा पाठिंबा आम्ही स्वीकारला नसला तरी तो नाकारला नाही - मुख्यमंत्री फडणवीस

सायंकाळी 6.39 वाजता: राज्यपालांना धक्काबुक्की करणारे पाच आमदार निलंबित

अब्दुल सत्तार, राहूल बोन्द्रे, जयकुमार गोरे, वीरेंद्र जगताप, अमर काळे निलंबित
दोन वर्षांसाठी केलं निलंबित

काँग्रेसचे पाच आमदार निलंबित

दोन वर्षांसाठी निलंबित
राज्यपालांना केली धक्काबुक्की

राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसच्या १२ आमदारांवर ठपका

काँग्रेसच्या 10 आमदारांचं निलंबन करा- खडसे

राज्यपालांना झाली धक्काबुक्की
काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी 

सायंकाळी 4.50 वाजता :

- अभिभाषणादरम्यान काँग्रेसच्या आमदारांनी भाजप आणि राज्यपालांचा निषेध करत केला सभात्याग  

सायंकाळी 04.11 वाजता: गदारोळातच राज्यपालाचं अभिभाषण सुरू

- अभिभाषणासाठी राज्यपाल विधिमंडळात दाखल
- राज्यपालांना परत जाण्याच्या घोषणा... 
- माझं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल
- राज्यासमोर अनेक समस्या आहेत
- विकासासाठी जनतेनं कौल दिलाय
- 'आपलं सरकार' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लवकरच लॉन्च करणार
- सोपे कायदे करण्याचा प्रयत्न करणार
- लोकोपयोगी प्रशासनावर भर
- 'नही चलेगी नही चलेगी... दादागिरी नही चलेगी'... भाषणादरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी 
-'राज्यपाल चले जाव' विरोधकांचा नारा
- इंदूमिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृतिस्थळ उभारणार
- शिवरायांचं समुद्रातील स्मारक पूर्ण करणार
- लवकरच एलबीटी रद्द करणार
- कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी विशेष योजना
- राज्यातल्या गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न करणार
- २४ तास वीज आणि पाणी पुरवठ्यासाठी कटबद्ध
- थेट शेतकरी आणि ग्राहक व्यवहारासाठी प्रयत्न
- सार्वजनिक पुरवठ्याची व्यवस्था पारदर्शक करणार
- ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन धोरण आणणार
- अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण करणार
- अन्नधान्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार
- ग्रामीण भागातल्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न
- ग्रामीण भागातल्या स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न 
- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार
-  वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणार
- वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी विशेष प्रयत्न
- नद्यांमधलं प्रदूषण कमी करण्यासाठी कटीबद्ध
- मुंबई-गोवा चौपदरी मार्गाचं काम लवकरच लवकर पूर्ण करणार
- राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणार
- येत्या पाच वर्षात राज्यात स्मार्ट सिटी उभारणार
- स्मार्ट सिटीच्या माध्यमातून माहिती देणार
- परवडणारी घरं उपलब्ध करून देणार

 

 

दुुपारी 04.07 वाजता: राज्यपालांची गाडी तब्बल सात मिनीटं रोखली

विधानभवनात राज्यपाल अभिभाषणासाठी जात असता... शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून धरली... भाषण न करण्याची मागणी... तब्बल 7 मिनीटं रोखून धरलं...

तर काँग्रेसच्या आमदारांनी पायऱ्यांवर बसून थांबवण्याचा प्रयत्न

दुपारी 3.40 वाजता

राज्यपालांनी अभिभाषणाला जाऊ नये, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. एका पत्राद्वारे काँग्रेसनं ही विनंती केलीय. 

दुपारी 01.44 वाजता: विरोधी पक्षनेता नंतर निवडून आवाजी मतदान घेतलं

उल्हास बापट, घटनातज्ज्ञ- माझ्यामते भाजप सरकारनं नियम धाब्यावर बसवले...

नियमाप्रमाणे विरोधी पक्षनेता निवडला गेला असतांना मतदानच घ्यावं लागतं... त्यामुळं आपल्या कार्यक्रमात बदल करून भाजपनं पहिले अध्यक्ष निवडीनंतर विश्वासदर्शक ठराव मांडला... आणि तो आवाजी मतदानानं पास केला. त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडला... तांत्रिक दृष्ट्या हे बरोबर असलं तरी लोकशाहीच्या दृष्टीनं हे चुकीचं आहे. 

दुपारी 01.39 वाजता: अनंत गितेंबाबत निर्णय लवकरच

अनिल देसाईंना दिल्लीतून शपथ न घेताच उद्धव ठाकरेंनी परत बोलावलंय... आता अनंत गितेंबाबतचा निर्णय लवकरच कळणार...

दुपारी 01.32 वाजता: हिंमत असेल तर पुन्हा मतदान घ्या

अध्यक्षांवरही कारवाई करण्याची करणार मागणी, नियम 25 अंतर्गत नियम पाळण्याची मागणी...

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सर्व पक्षांसोबत चर्चा करणार... कोण-कोण सोबत आहे ते महाराष्ट्राला कळायला हवं... भाजपचेच काही आमदार त्यांना मतदान करणार नव्हते... ही अंदर की बात आहे... गडकरींच्या बंगल्यावर बरंच काही घडलंय... 

भाजप सरकारचा धिक्कार आहे... मतदान घेऊन विश्वासदर्शक ठराव मांडा- रामदास कदम

सहा महिने सरकार तरेल असं वाटत असेल तर त्यांनी नागपूर अधिवेशनात पाहून घेऊ...

नियमांची पायमल्ली केलीय त्यांनी.... भाजपने विधीमंडळाला काळीमा फासला- कदम

नियम 23 पाळला नाही

दुपारी 01.28 वाजता: विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू

विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेच्या गोंधळात विधासभेचं कामकाज पुन्हा सुरू... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

दुपारी 01.21 वाजता: आजचा काळा दिवस- पृथ्वीराज चव्हाण

आवाजी मतदानाचा आणि भाजप सरकारचा तीव्र निषेध- पृथ्वीराज चव्हाण

उद्या राज्यपालांना भेटणार, फडणवीसांनी राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील

पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्याची काँग्रेसची मागणी, मतदान घेऊन बहूमत सिद्ध करण्याची मागणी

काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

दुपारी 01.15 वाजता: देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, ही लोकशाहीची हत्या

आम्ही मतदानाची मागणी केली. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारनं राजीनामा द्यायला हवा, काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंची मागणी. काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीही संतप्त...

दुपारी 01.11 वाजता: शिवसेनेच्या गदारोळामुळं विधानसभेचं कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब 

विधानसभेचं कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आलंय. विश्वासदर्शक मतदान घ्यावं, शिवसेनेची मागणी... सरकार विरोधी घोषणाबाजी... 

दुपारी 12.59 वाजता: सहा महिन्यांनी पुन्हा बहूमत करावं लागणार सिद्ध

विधानपरिषद सभापतींनी शिवसेना-काँग्रेसची मतविभाजणीची मागणी फेटाळली. पुढील सहा महिन्यांसाठी भाजप सरकार पक्क. सहा महिन्यांनी पुन्हा करावं लागणार बहुमत सिद्ध. 

दुपारी 12.55 वाजता: राष्ट्रवादीच्या मतांवरच आता भाजप सरकार चालणार

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप सरकारला पाठिंबा दिलाय. आवाजी मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा देत भाजप सरकारला वाचवलं. त्यामुळं एकूणच आता भाजप सरकार 'पवारालंबी'  झाल्याचं म्हणता येईल.

दुपारी 12.45 वाजता: विरोधी पक्षेनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेना विरोधी बाकांवरच बसणार

सुरुवातीला काँग्रेसचा प्रस्ताव वाचून दाखवला त्यानंतर गोंधळ झाला... त्यानंतर शिवसेनेचा प्रस्ताव वाचला, त्यामुळं गोंधळ झाला..

विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या एकनाथ शिदेंची निवड

सभागृह 5 मिनीटांसाठी तहकूब

दुपारी 12.43 वाजता:  आवाजी मतदानानं भाजपचा विश्वासदर्शक ठराव मंजूर

आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर

काँग्रेस-शिवसेनेची मतदानाची मागणी

आशिष शेलार यांनी मांडला विश्वासदर्शक ठराव

दुपारी 12.37 वाजता: छगन भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी

शिवसेनेवर केली टीका, शिवसेना 'सामना'तून टीका करतच राहते

सकाळी ११ वाजता : सेनेच्या धरसोड भूमिकेवर आमदारांचा मोठा गट नाराज
शिवसेनेच्या धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना आमदारांची मतं विचारात न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढच चालली आहे. शिवसेनेचा हा नाराज गट मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. विश्वासदर्शक ठरावाला काही वेळ राहिला असतांना शिवसेना आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचं सांगण्यात येत असलं तरी फुटाफुटीची शक्यता मात्र नाहीय, कारण हे मतदान उघड-उघड असल्याने शिवसेनेचे आमदार पक्षविरोधी भूमिकेत मतदान करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

सकाळी १०.४५ वाजता : मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली
मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं. मात्र तुम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करा, त्यानंतर मंत्रिपदाच्या वाटपावर चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र ही विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळून लावली आहे. 

सकाळी १०.३० वाजता : रामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात
आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम आणि मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. ते आणि रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याने अजूनही शिवसेना-भाजपची चर्चा सुरूच असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळी १०.०० वाजता : विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी देखील अर्ज मागे घेतलाय. आता, भाजपचे हरिभाऊ बागडे हे विधान सभेचे नवे अध्यक्ष असतील. 

शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम
शिवसेनेनं अखेर विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.

यानंतर, सर्वांची नजर पुन्हा राष्ट्रवादीकडे लागली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत पाठिंब्याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं, तरी स्थिर सरकारसाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सुरूवातीपासून म्हटलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.