सलमानसाठी पाऊस आला धावून, सुनावणी पुढे ढकलली

हीट अँड रन केसमध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावरील सुनावणी २४ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 10, 2013, 02:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हीट अँड रन केसमध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावरील सुनावणी २४ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे न्यायालयातील कर्मचारी उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
सलमान खानने सप्टेंबर २००२ मध्ये वांद्रे येथे हा अपघात केला होता. आधी याप्रकरणी त्याच्यावर केवळ हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण नुकताच वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला होता. सलमान वरील सुनावणी आज (सोमवार) येथील सत्र न्यायालयात झाली. यावेळी सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी सुनावणी २४ जून पर्यंत पुढे ढकलली आहे.
दरम्यान, कायद्यानुसार हलगर्जीपणासाठी केवळ दोन वर्षांचीच शिक्षा होऊ शकते. सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयास सलमानने सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी सरकारी पक्षाला मदत करण्याकरिता या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अर्ज केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.