१२वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात, इथियोपियाच्या धावपटूंची सरशी

रन मुंबई रन असा नारा देत, मुंबईकर आज रस्त्यावर उतरले. निमित्त आहे बाराव्या मुंबई मॅरेथॉनचं. सीएसटीपासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली.

Updated: Jan 18, 2015, 01:19 PM IST
१२वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात, इथियोपियाच्या धावपटूंची सरशी title=

मुंबई: मुंबईची ओळख असलेली मुंबई मॅरेथॉन यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. ४० हजारांहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. पाच गटामध्ये ही स्पर्धा घेतली गेली. सेलिब्रेटींपासून सामान्य मुंबईकरांचा यात सहभाग होता. त्याला तोडीसतोड म्हणजे वृद्धांनीही सामील होत आपणही कुठे कमी नसल्याचं दाखवून दिलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मॅरेथॉनला आवर्जून हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथियोपिया देशातल्या धावपटूंनी बाजी मारली. पुरुष गटात टेसफे अबेरा आणि डेरेजे डेबेले या इथियोपियाच्या धावपटूंनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या स्थानी केनियाच्या लूक किबेटचा नंबर लागला. 

भारतीय फुल मॅरेथॉनमध्ये करनसिंग, अर्जुन प्रधान आणि बहादूर सिंग धोनी विजयी ठरले. तर महिला गटात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये डिंकनेश मेकाश हिनं पहिलं स्थान पटकावलं. तर कुमेशी सिचाला दुसऱ्या आणि मार्टा मेग्रा तिसऱ्या स्थानी राहिली. भारतीय महिलांमध्ये ओ. पी. जयशा पहिली आली. तर महाराष्ट्राच्या ललिता बाबरनं दुसरं स्थान पटकावलं. तिसऱ्या स्थानी सुधा सिंगची वर्णी लागली. 

तर हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात इंद्रजीत पटेल यानं पहिला क्रमांक पटकावला. अत्वभगत यानं दुसरा आणि गोविंदसिंग यानं तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात कविता राऊत विजेती ठरली. इव्ह बगलर दुसऱ्या स्थानावर आली. तर सुप्रिया पाटीलनं तिसरं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे यंदाच्या भारतीय महिला आणि पुरुष विजेत्यांना नोव्हेंबरमध्ये रंगणाऱ्या न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळणार आहे.ृ

फूल मॅरेथॉन (इंडियन) (पुरूष गट)
१. करण सिंग 
२. अर्जुन सिंग
३. बहादूरसिंग धोनी

फूल मॅरेथॉन (आंतरराष्ट्रीय) (पुरूष गट)

१. टेसफेए अबेरा (इथिओपिया)

२. डेरेजे डिबेले (इथिओपिया)

३. ल्युक किबेट (केनिया)

महिला गट (फुल मॅरेथॉन)

१. ओ.पी.जैशा
२. ललिता बाबर

आतंरराष्ट्रीय महिला (फुल मॅरेथॉन)
१. डिंक्नेंश मेकाश (इथिओपिया)
२. कुमेशी सिचाला (इथिओपिया)

हाफ मॅरेथॉन विजेते (पुरूष गट)-
१. इंदरजीतसिंग पटेल, ओएनजीसी. १ तास ८ मिनिट ९ सेकंद

२. अत्वभगत, आर्मी. १ तास ८ मिनिट ११ सेकंद

३. गोविंद सिंग, आर्मी १ तास ८ मिनिट १४ सेकंद

 
हाफ मॅरेथॉन विजेते (महिला गट) –

१. कविता राऊतला सुवर्णपदक  

२. इव्ह बगलर

३. सुप्रिया पाटील

मुंबई: रन मुंबई रन असा नारा देत, मुंबईकर आज रस्त्यावर उतरले. निमित्त आहे बाराव्या मुंबई मॅरेथॉनचं. सीएसटीपासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा चाळीस हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय अॅथलीट्ससह हौशी धावपटू, मुंबईकर तसचं सेलिब्रिटीजचाही समावेश आहे.

मुंबईकरांच्या स्पोर्टस कॅलेण्डरचा अविभाज्य भाग बनलेल्या या शर्यतीचं यंदाचं हे बारावं वर्ष आहे. मुख्य मॅरेथॉन सीएसटीवरुन राजीव गांधी सागरी सेतूवरुन पुन्हा सीएसटी इथं स्पर्धेचा शेवट होईल.

कडेकोट सुरक्षा
 
मुंबई मॅरेथॉनदरम्यान सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर एखादा स्पर्धक जखमी झाल्यास उपचारासाठी ११ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.