विधानसभेत स्वतंत्र विदर्भचा नारा, त्यानंतर राडा

स्वतंत्र विदर्भच्या घोषणा देणाऱे भाजप आमदार आणि राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यांत विधानसभेत चांगलाच राडा पाहायला मिळायला.

Updated: Jul 29, 2016, 03:35 PM IST
विधानसभेत स्वतंत्र विदर्भचा नारा, त्यानंतर राडा title=

मुंबई : स्वतंत्र विदर्भच्या घोषणा देणाऱे भाजप आमदार आणि राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यांत विधानसभेत चांगलाच राडा पाहायला मिळायला.

स्वतंत्र विदर्भच्या घोषणा देणाऱ्या भाजपच्या आमदारांवर दिवाकर रावते अक्षरश: धावून गेले. यामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.

भाजप आमदार विकास कुंभारे,सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे, आशिष देशमुख या आमदारांनी विधानसभेत स्वतंत्र विदर्भच्या घोषणा दिल्या. यावेळी रावते रामचंद्र अवसरे यांच्यात चांगलीच जुंपली. त्यावेळी गिरीष महाजन आणि भाजप आमदार राम कदम यांनी त्यांना अडवले.