मरीन ड्राईव्ह परेडसाठी सज्ज!

मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर केली जाणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 26, 2014, 08:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर केली जाणार आहे.
नौदल, हवाईदल आणि लष्कराचे जवानही यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं हवाईदलाच्या दिमाखदार कसरती, युद्धनौकांच्या प्रतिकृती नागरिकांना पाहता येतील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी १० हजार जणांची आसनव्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीनं आणि गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सकाळी ८च्या पूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहचण्याचं आवाहन वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलंय. दरम्यान, या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.