प्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!

प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 25, 2014, 10:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत. तसंच या दिवशी हा सोहळा पाहायला येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी देण्यात आलीय.
यावेळी मोठ्या संख्येनं मुंबईकर ही परेड बघायला येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आर्मीचे  ३५ प्लॅटून्स आणि २७ चित्ररथ भाग घेणार असून शाळकरी मुलंदेखील या परेडचा भाग असतील. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी या परेडची सुरुवात `एनसीपीए` इथून होईल तर शेवट प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर इथं होईल.
पाहा, या सोहळ्यासाठी वाहतूकीत काय काय बदल करण्यात आलेत....
* मरिन ड्राइव्ह दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद
* सोहळ्यासाठी येणाऱ्यांनी लोकलचाच वापर करण्याचे आवाहन
* दक्षिणेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी रफी अहमद किडवाई मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा वापर करावा
* एअर इंडिया जंक्शनजवळ सोहळ्याच्या ठिकाणी पासधारकांनाच प्रवेश
* वाळकेश्वर, डॉ.अ‍ॅनी बेझंट रोड, पेडर रोड वाहनचालकांना ठरावीक ठिकाणी खुला
* मादाम कामा रोड वाहनांसाठी बंद

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.