अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक

अंधेरीतील लोटस बारमधून २४ तरुणींना अटक करण्यात आली. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अनैतिक कामं सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, यानंतर त्यांनी धाड टाकली.

Updated: Dec 30, 2015, 05:13 PM IST
अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक title=

मुंबई : अंधेरीतील लोटस बारमधून २४ तरुणींना अटक करण्यात आली. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अनैतिक कामं सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, यानंतर त्यांनी धाड टाकली.

नियमानुसार ऑर्केस्ट्रामध्ये फक्त चार तरुणी काम करु शकतात. मात्र या ठिकाणी १२ तरुणी सापडल्या. पोलिसांना आणखी काही तरुणी बारमध्ये असाव्यात असा संशय आला. 

बारमध्येच एका गुप्त खोलीमध्ये आणखी १२ जणी लपून बसल्या होत्या. पोलिसांनी लोटस बारला टाळ लावण्यात आलं आहे. बार मालक आणि मॅनेजर फरार झाला आहे.