मुंबई : 'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय.
अधिक वाचा - 'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन
जगण्यातील भीषण वास्तव मांडतानाच, जगण्यावर प्रेम करायला शिकविणारा संवेदनशील कवी श्री मंगेश पाडगावकरजी यांच्या निधनाने आपल्यातून निघून गेला.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2015
‘सांग सांग भोलानाथ’, ‘भातुकलीच्या खेळामधूनी’ पासून तर अगदी ‘शुक्रतारा’पर्यंत प्रत्येकाच्या मनावर त्यांनी सुमारे 70 वर्ष अधिराज्य गाजविले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2015
‘सांग सांग भोलानाथ’, ‘भातुकलीच्या खेळामधूनी’ पासून तर अगदी ‘शुक्रतारा’पर्यंत प्रत्येकाच्या मनावर त्यांनी सुमारे 70 वर्ष अधिराज्य गाजविले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2015
केवळ कविताच नाही, तर अवघ्या साहित्य विश्वाला समृद्ध करणाऱ्या एका प्रतिभावान आणि थोर साहित्यिकाला आज महाराष्ट्र मुकला आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2015
Deepest condolence to the iconic Marathi poet Mangesh Padgaonkar. His style of writing was refreshingly positive & adoringly youthful. (1/2)
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 30, 2015
महाराष्ट्राला प्रेम शिकवणारे, जीवनगाणे देणारे महान कवी मंगेश पाडगावकरांच्या निधनाने साहित्याची अपरीमित हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2015
मंगेश पाडगावकरांना राजसाहेबांनी वाहिलेली श्रद्धांजली pic.twitter.com/Xj9sbsvDDZ
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 30, 2015
मंगेश पाडगावकर यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात व्हावे, अशी मी विनंती केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे मान्य केली.
— ashish shelar (@ShelarAshish) December 30, 2015
यशोदाताई मंगेश पाडगावकर आणि कुटुंबियांचे सांत्वन ! pic.twitter.com/hXTCtOP7T4
— ashish shelar (@ShelarAshish) December 30, 2015
प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आमचं सेम असतं, असे शिकवणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण आदरांजली ... pic.twitter.com/Sejf9WsAY0
— Shalini Thackeray (@ThakareShalini) December 30, 2015
महाराष्ट्राला प्रेम शिकविणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आशयघन कवितांना आपण कायमचे मुकलो आहोत. श्रद्धांजली!
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 30, 2015
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली #RIP
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 30, 2015