अरुण शानबाग यांची प्रकृती खालावली

मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.

Updated: May 16, 2015, 09:23 AM IST
अरुण शानबाग यांची प्रकृती खालावली title=

मुंबई : मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.

न्यूमोनियामुळे शानबाग यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे  औषधांना त्या प्रतिसाद देत असल्याची माहिती केईएमचे डीन अविनाश सुपे यांनी दिलीय. यापूर्वी, नोव्हेंबर २०१३ मध्ये शानबाग यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 

केईएम हॉस्पीटलमध्ये कर्मचारिकेचं प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झालेल्या अरुणा शानबाग यांच्यावर १९७३ मध्ये हॉस्पीटलचाच कर्मचारी असलेल्या सोहनलालकडून बलात्कार करण्यात आला होता. 
या घटनेनंतर अरुणा कायमस्वरुपी कोमात गेल्या होत्या. या प्रकरणात दोषी ठरलेल्या सोहनलालला ७ वर्षांची शिक्षाही झाली होती. ही शिक्षा भोगून सोहनलाल केव्हाच तुरुंगातून बाहेरही आलाय. पण, अरुणा शानबाग यांच्या मरण यातना मात्र अद्यापही संपलेल्या नाहीत. 
  
२४ जानेवारी २०११ रोजी २७ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टानं अरुणा यांची मैत्रिण पिंकी बिरमानी हिनं इच्छा मरणासाठी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली होती. या घटनेनंतर संपूर्ण भारतात 'इच्छा मरण' या विषयावर खल सुरू झाला होता.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.