मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मन मोठं करा पण महायुती तोडू नका, अशी विनंती राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या काळानंतर परिवर्तनाची लाट आली आहे, यासाठी सर्व स्तरातील जनता एकत्र आली आहे. सत्तेच्या जवळ असतांना टोकाची भूमिका घेऊ नका, अशी विनंती राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.
सर्वांनी समजूतदारपणे घ्यावं, महाराष्ट्राला काँग्रेस राष्ट्रवादीचं ग्रहण लागलं आहे, हे ग्रहण शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन दूर करू शकतात, असंही राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे.
यावर उद्धव ठाकरे यांनी आपण टोकाची भूमिका घेणार नाहीत, पण भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने देखिल लवचिक भूमिका स्वीकारायला हवी असं म्हटलं आहे.
महायुतीत शिवसेना आणि भाजपनंतर स्वाभिनानी शेतकरी संघटना हा सर्वात मोठा पक्ष आहे, म्हणून राजू शेट्टी यांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे. एकंदरीत महायुती तुटू नये, म्हणून महायुतीच्या घटक पक्षांनी तडजोडीसाठी प्रयत्न सुरू केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.