www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना आज वांद्रे कोर्टात हजर रहावं लागणार आहे.
याप्रकरणी गेल्या काही सुनावणींमध्ये ते सलग अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आल्यानं आता त्यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे.
ऑक्टोबर २००८ मध्ये डोंबिवली व कल्याणात मनसैनिकांनी आक्रमक होत परप्रांतियांना मारहाण केली व त्याप्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांसह पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सहआरोपी केलं होतं. ठाकरे यांना २१ ऑक्टोबर रोजी अटक करुन मानपाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. त्यावेळी मनसैनिकांनी कल्याण व डोंबिवलीत प्रचंड तोडफोड करुन संताप व्यक्त केला होता.
याप्रकरणातील काही सुनावणीसाठी काही वेळा राज ठाकरे याप्रकरणातील सुनावणीला कल्याण कोर्टात हजर राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी सुनावणीला फारसं महत्त्व न देता घरी राहणंच पसंत केलं. अखेर कोर्टाला त्यांच्यावर वॉरंट बजवावं लागलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.