याच महिन्यात येणार, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट अखेर सर्वांच्या समोर येणार आहे. यासाठी राज ठाकरे हे तुमची उत्सुकता जास्त ताणून धरणार नाहीयत, कारण ही ब्लू प्रिन्ट याच महिन्यात प्रकाशित होणार आहे.

Updated: Aug 11, 2014, 11:09 PM IST
याच महिन्यात येणार, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट अखेर सर्वांच्या समोर येणार आहे. यासाठी राज ठाकरे हे तुमची उत्सुकता जास्त ताणून धरणार नाहीयत, कारण ही ब्लू प्रिन्ट याच महिन्यात प्रकाशित होणार आहे.

या प्रकाशानावेळी उद्योगपती आणि ज्यांची जंटलमन म्हणून ओळख आहे, असे रतन टाटा, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला हे एकाच व्यासपिठावर येणार आहेत. यातून राज्याच्या विकासासाठी तीनही उद्योगपतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. यातून नकारात्मकतापेक्षा, सकारात्मक भूमिकेवर भर दिला आहे.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गणपतीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यावरून विधानसभा निवडणुकीची मनसेची तयारी जोरदार असल्याचंही दिसून येतंय. मनसेच्या पहिल्या 100 उमेदवारांची यादी तयार आहे. तर दुसऱ्या 100 उमेदवारांच्या यादीवर काम सुरूय. मुंबईच्या उमेदवारांसंदर्भातही काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.