राज ठाकरेंची अखेर सुटका

राज ठाकरे यांची उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे आरसीएफ पोलिस स्टेशनबाहेर आल्यानंतर राज काय बोलतील, यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.

Updated: Feb 12, 2014, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोलिसांकडून अखेर सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
राज ठाकरे आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये असतांना त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं.
राज ठाकरे यांच्याशी उद्या सकाळी नऊ वाजता, सह्याद्रीवर बोलणी करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही चर्चेची तयारी दाखवली होती, मात्र ती मीडियासमोर व्हावी, असं राज यांनी म्हटलं होतं. चर्चा मी़डियासमोर करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी नाकारली होती. तेव्हा उद्याची चर्चा ही मीडियासमोर होईल का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकांना त्रास देण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता, चुकीची टोल वसुली ही बाब सरकारच्या ध्यानात आणून देणे हा मुद्दा होता, आणि यात आम्ही सफल झालो आहोत, असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या सुटकेनंतर राज यांचं राज्यभरातलं आंदोलन तूर्तास थांबल्याचे संकेत मिळत आहेत.