मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे

येथील मोकळ्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरु करत आहोत. ही मोहीम सर्वपक्षीय असेल. यात राजकारण नसेल. मात्र, जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशारा राज यांनी दिला.

Updated: Jan 15, 2016, 03:55 PM IST
मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे title=

मुंबई : येथील मोकळ्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरु करत आहोत. ही मोहीम सर्वपक्षीय असेल. यात राजकारण नसेल. मात्र, जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशारा राज यांनी दिला.

१२०० एकर जागा खासगी बिल्डरांना देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत बहुमताच्या जोरावर पास झाला. पण हा प्रस्ताव रस्त्यावर पास होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. क्लब थाटून पैसे कमावण्यासाठी हा घाट घातला जातोय. भविष्यातल्या पिढ्यांसाठी मोकळ्या जागा वाढवण्यासाठी मनसे स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. या सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने इतर पक्षांच्या मदतीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला असला, तरी मनसेचा त्याला विरोध आहे. या विरोधात पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून, कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

मुंबईतील मोकळ्या जागांवर असलेली आरक्षणे हटविण्यास मनसेच्या स्थापनेपासूनच आमचा विरोध आहे. मोकळ्या जागा, बागा, मैदाने ही या शहराची फुफ्फुसे आहेत. त्यामुळे त्यावरील आरक्षणे हटविण्यास आम्ही कायम विरोध करत आलो आहोत. शहरातील १२०० एकर जागा खासगी विकसकांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मनसेने पालिकेत या प्रस्तावाल विरोध केला आहे, असे राज यांनी सांगितले.