राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 13, 2014, 12:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेसाठी निवडक पत्रकारांचे एक शिष्टमंडळही होते. या शिष्टमंडळात झी २४ तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर उपस्थित होते.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय झाली चर्चा
१) आचारसंहितेपूर्वी नवीन टोल धोरण
२) शक्य असेल तेथे हे धोरण पूर्वलक्षी पद्धतीने लागू करणार
३) एसटीला नव्या टोल धोरणात सूट देण्याचा सकारात्मक विचार
४) वादग्रस्त टोलनाक्यांचा तातडीने पूनर्विचार
५) केंद्र शासनाच्या नियमांचे पालन होणार याची काळजी घेणार
६) महामार्गवरील अवजड वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीला आळा घालणार
७) टोलनाक्यांवरील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड सुधारून अधिक माहितीपूर्ण करणार
८) ५ ते १० कोटी रकमेचे खर्च ज्या रस्त्यांवर तेथ टोल रद्द करण्याविषयी सकारात्मक भूमिका
९) तातडीने डॉक्टर्स नर्ससह अँम्बुलन्स उपलब्ध करून देणार ( लवकर २०० अँम्बुलन्स कार्यरत)
१०) जेथे टोल संपला आहे तेथील टोल बूथ काढून टाकणार
११) ठाणे वाशी प्रवासातील ऐरोली नाक्यावर ठाण्याची पावती दाखवल्यावर सूट देण्याचा सकारात्मक विचार
१२) टॉयलेट बाबतीत अक्षम्य झालेल्या चुका सुधारणार
१३) यापूर्वी काही टोल कंत्राटात चुका झाल्याची कबुली
१४) एमएसआरडीसी- एनएचएआय – पीडब्ल्यूडीमध्ये सुसूत्रता आणणार
१५) सरकार टोलनाक्यावर स्वतः कलेक्शन करणार ७५ टक्के कंत्राटदाराला आणि २५ टक्के शासनाला पैसा मिळण्याचा विचार

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.