राज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार

राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 13, 2014, 01:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलप्रश्नाबाबत चर्चा झाली. या चर्चेसाठी काही पत्रकारांचे एक शिष्टमंडळही होते. या शिष्टमंडळात झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भजबळ , मंत्री जयदत्त क्षीरसागर,रणजित कांबळे उपस्थित होते. राज यांच्यासोबत मनसे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, प्रविण दरेकर, सरचिटणीस अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर होते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टोलबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. तसेच येत्या पंधरा दिवसांत राज्य सरकार टोल धोरण जाहीर करणार आहे. तसेच ज्या रस्ता प्रकल्पांचा खर्च १० कोटींपेक्षा कमी आहे, ते टोलनाके बंद करू, मुख्यमंत्री म्हणालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.