रेल्वे दरवाढ : विधानसभेला मुंबईकरांची मतं कुणाला?

रेल्वे भाडेवाढीचा आणि मुंबईकरांचा तसा फारच जवळचा संबंध आहे. रेल्वे भाडेवाढ भरमसाठ प्रमाणात झाली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून राज्यातल्या भाजप नेत्यांनी मुंबईकरांची मतं विरोधात जाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.

Updated: Jun 24, 2014, 01:26 PM IST
रेल्वे दरवाढ : विधानसभेला मुंबईकरांची मतं कुणाला? title=

नवी दिल्ली : रेल्वे भाडेवाढीचा आणि मुंबईकरांचा तसा फारच जवळचा संबंध आहे. रेल्वे भाडेवाढ भरमसाठ प्रमाणात झाली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून राज्यातल्या भाजप नेत्यांनी मुंबईकरांची मतं विरोधात जाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.

मात्र रेल्वे भाडेवाढीवर काही उपाय काढता येईल का?, निदान पासधारकांना तात्पूर्ती सवलत देता येईल, भाडेवाढ टप्प्याटप्प्याने करता येईल का?, असे पर्याय रेल्वे मंत्रालयासमोर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईकरांच्या मागणीचा सकारात्मक विचार
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मुंबईकरांच्या मागणीचा सकारात्मक विचार करु असं आश्वासनं दिलं आहे, ही माहिती भाजप नेत्यांनी दिली. मुंबईचे खासदार आणि रेल्वेमंत्री यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक पार पडली. 

या बैठकीला किरीट सोमय्या, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, पूनम महाजन, गजानन कीर्तीकर, कपिल पाटील, अरविंद सावंत, गोपाळ शेट्टी, पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार तसेच रामदास आठवले उपस्थित होते.

मासिक पासची दरवाढ कमी करण्याचा निर्णय?
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी म्हणजे, रेल्वे मंत्र्यांनी मासिक पासची दरवाढ कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही दरवाढ एकाच वेळी न करता टप्प्या-टप्प्याने होणार असल्याची शक्यता आहे. हा निर्णय अमलात आला, तर तूर्तास तरी दुप्पटीने वाढवण्यात आलेल्या मासिक दरांतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

केंद्र सरकारनं जाहीर केलेली रेल्वे दरवाढ अयोग्य आहे, अशी भावना सध्या सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये फटका बसू नये यासाठी राज्यातील युतीच्या नेत्यांची दिल्लीत धावाधाव सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून आज नवी दिल्लीत ही बैठक पार पडली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.