मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.
या सुविधेचा लाभ एकाच कुटुंबातील व्यक्तींना घेता येणार आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावर नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रवास करावयाचा असेल तर त्याला दुसरे आरक्षित तिकीट काढावे लागत होते. आता मात्र, नावात बदल केले की ही सुविधा मिळू शकेल.
मात्र, गाडी सुटण्याच्या २४ तास आधी नाव बदलण्याच्या सुविधा घेता येऊ शकेल. त्यासाठी तिकिटात बदल करण्यासाठी रेल्वेच्या http://www.indianrail.gov.in/change_Name.html या संकेतस्थळावर याबाबात माहिती देण्यात आली आहे. नाव बदलण्याबाबात महत्त्वाच्या स्थानकांवरील मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना याबाबतचे हक्क देण्यात आले आहे.
काय आहेत अटी?
- प्रवासी सरकारी नोकर असेल आणि तो सरकारी कामानिमित्त प्रवास करीत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र सादर करून नाव बदल करु शकतो.
- प्रवाशाने गाडी सुटण्याच्या २४ तास आधी माझे आरक्षण माझ्या कुटुंबातील अमूक व्यक्तीच्या नावावर करावे असे लेखी पत्र दिले तर नाव बदल होऊ शकते.
- कुटुंबातील व्यक्ती आरक्षित तिकिटावर नाव असलेल्या व्यक्तीचे वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नवरा किंवा बायको असायला हवेत.
-प्रवासी विद्यार्थी असेल आणि त्याच संस्थेतील दुसऱ्या विद्यार्थ्यांला प्रवास करावयाचा असेल तर संस्थाप्रमुखांचे पत्र गाडी सुटण्याच्या ४८ तास आधी रेल्वे प्रशासनाला सादर करावयाचे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.