मुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर

लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.

Updated: Oct 8, 2015, 06:17 PM IST
मुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर title=

मुंबई : लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.

शिवाय पास काढायचा असल्यानं उशिर झाल्याची सबब बॉसला सांगता येणार नाहीय.... कारण रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पेपरलेस मासिक पासची सुविधा सुरु करणार आहेत.

रेल्वेने अनारक्षित तिकीटांसाठी ही सुविधा काही निवडक स्टेशनवर याआधीच सुरू केलीय. उद्या या सेवेत मासिक पासही उपलब्ध होणार आहेत. मुंबईतल्या लाखो पासधारकांना या सुविधेनं मोठा फायदा होणार आहे. रेल्वेच्या UTS मोबाईल अॅपच्या माध्यमातून पास मिळणार आहे. अँड्रोईड स्मार्ट फोनवर हे अॅप उपलब्ध आहे....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.