राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजेरी लावणार?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

Updated: Mar 30, 2015, 12:20 PM IST
राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजेरी लावणार? title=

मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

आरएसएसबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आज भिवंडी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित न रहाण्याची मुभा मिळावी, यासाठी राहुल गांधींनी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयानं त्यांची मागणी फेटाळलीय.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीच्या प्रचार सभेत त्यांनी गांधीहत्येवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. राहुल गांधींच्या या आरोपाला आक्षेप घेत त्यांच्याविरोधात, भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. 

त्यावर हा खटलाच रद्द करावा, अशी याचिकाही राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ती याचिकासुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. 

दरम्यान, राहुल गांधी परदेशात असल्यामुळे ते सुनावणीला हजर कसे राहणार? असा प्रश्न निर्माण होतोय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.