राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

Updated: Aug 14, 2015, 11:45 AM IST
राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी title=

मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

आता राधे माँला वरच्या कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. मात्र तूर्तास तरी राधे माँला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येण्याची शक्यता आहे.

राधे माँच्या विरोधात कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये निकी गुप्ता यांनी हुंडा मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केलीये. राधे माँच्या सांगण्य़ावरुनच पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं निकीनं या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी राधे माँसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे राधे माँच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

वादग्रस्त राधे माँचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी एक प्रश्नावली तयार केलीय. यात
निधी गुप्ता कुटुंबाला केव्हापासून ओळखता?
निधी गुप्ता यांना मारहणा केली होती का?
निधीने केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का?
तुम्ही विमानाची मागणी केली होती का? आदी प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.