मुंबई : काँग्रेस गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी विजय वेडेट्टीवार हे असतील. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत एकूण ४२ जागा आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडी सरकारमध्ये राज्याचे कृषीमंत्री होते, आज काँग्रेस विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगणार आहे. कारण आतापर्यंत शिवसेनेची भूमिका तळ्यात मळ्यात राहिलेली आहे.
मोदी सरकारने केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने सहभाग घेतला नाही, त्यानंतर राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा घेतला तर विरोधात बसू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
एकंदरीत सत्ता सहभागावरून शिवसेना अजूनही तळ्यात मळ्यात आहे, त्यामुळे आज अधिवेशन सुरू झाल्याने काँग्रेस विरोधीपक्षनेतेपदावर दावा सांगणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.