मुंबई : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संदीप बजोरिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे विधानभवनात सभापतींच्या दालनाबाहेर दोघांमध्ये तुंबळ भांडण झालं, आणि यावेळी ते एकमेकांवर धावून आल्याचंही सांगण्यात येत आहे. अखेर धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे-पाटील यांनी तात्पुर्ती मध्यस्थी केल्याने हा वाद सध्या तरी मिटला आहे.
या दोन आमदारांचा वाद नेमका कशावरून होता, हे अजून कळू शकलेलं नाही.