खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत

 एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा  महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले. 

Updated: Jul 25, 2016, 06:00 PM IST
खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत  title=

मुंबई :  एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा  महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले. 

भ्रष्टाचाराचे मंत्र्यांवर आरोप या विषयावर चर्चेला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले,  मी महसूल खात्याच्या पादुका ठेवून काम करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात किंवा अधिवेशन संपल्यानंतर खडसे पुन्हा महसूल मंत्रीपद स्वीकारतील असे संकेत यातून मिळत आहे. 

खडसेचे खडे बोल...

खडसे यांनी आपल्यावरील आरोपांवर उत्तर देताना काही दिवसांपूर्वी सर्वांना फैलावर घेतले होते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आणि माझा राजीनामा मागितला. माझ्यावर नुसते आरोप आहेत. पण असे काही आहेत,त्याचे पुरावेही माझ्याकडे आहे. असे म्हणून विरोधकांच्या खुर्चीखाली बॉम्ब लावला. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पेक्षा गंभीर आरोप येथील मंत्र्यांवर आहेत. मात्र खडसे यांना क्लीन चिट न देता राजीनामा घेतला. त्याच प्रमाणे आरोप असलेल्या मंत्र्यांची न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.