मुंबई : आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.
दलित आणि सवर्णांना एकत्र आणण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज आहे... आंतरजातीय विवाहाना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे... यासाठी 'सैराट' सिनेमा ही चांगली सुरुवात असल्याचं आठवले म्हणतात.
'सैराट'मुळे ऑनर किलिंगला प्रोत्साहन मिळतं, हा दावा त्यांनी साफ खोटा ठरवलाय... उलट अशा प्रकारचा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या विचारांत परिवर्तन केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.
नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा शेवट करताना हत्या दाखवली... पण, मनात कुठलीही चीड दाखवलेली नाही... मला वाटतं माणसाला गंभीरपणे विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. सैराट चित्रपटाअगोदरही ऑनर किलिंगसारख्या घटना घडल्या आहेतच की... आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय समाजातील जाती व्यवस्थेतली दरी मिटणार नाही, असं आठवले यांनी म्हटलंय. आपल्या मंत्र पदाचा उपयोग समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी करणार असल्याचंही त्यांनी आश्वासन दिलंय.