मुंबई : मुंबईतील साकीनाका भागात मॉ़डेलवर झालेल्या बलात्काराच्या चौकशीतून त्या मॉडेलसोबत पोलिसांनीच विकृत चाळे केल्याचं सत्य वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.
याप्रकरणी 8 आरोपीविरूद्ध क्राईम ब्रँचने 1168 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून आरोपपत्रामध्ये केईएमच्या वैद्यकीय अहवालाचाही समावेश करण्यात आलाय. त्यामुळे आरोपी पोलिस निरीक्षक सुनील खाटपेने केलेल्या विकृत चाळ्यांवर शिक्कामोर्तबच झालंय. खाटपेने महिलेसोबत विकृत चाळे, तसेच महिलेच्या विविध अंगाचे लचकेच तोडले, त्या खुणा महिलेच्या अंगावर असल्याचंही आरोपपत्रामध्ये नमूद केलं गेलंय.
पोलीस अधिकारी सुनील खाटपेनं एका हॉटेलसमोरून आपल्या खासगी गाडीनं बलात्कारपीडित मॉडेल आणि तिच्या प्रियकराचं अपहरण केलं होतं, असं क्राईम ब्रँचने सांगितलय. बलात्काराच्या घटनेनंतर खाटपेनं ती गाडी पुण्यातील एमआयडीसी पोलीस वसाहतीत पार्क केली होती. ती गाडी पोलिसांनी जप्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलय.
आरोपपत्रात सुनील खाटपे व्यतिरिक्त सुरेश सूर्यवंशी आणि योगेश पोंदे या पोलिसांचाही समावेश आहे. बलात्कारप्रकरणी सर्व आठ आरोपींविरोधात भादवि कलम १२० बी, ३८४, ३८८, ३७९, ३७६ (२), ३६५, ३६६, ३५४ (ए) (१), (२) अन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.