मुंबई : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत आलेत.
याप्रकरणी मारिया यांनी गृहखात्याचे प्रधान सचिव के. पी. बक्षी यांची भेट घेऊन, त्यांच्याकडं स्पष्टीकरणही दिलंय. मात्र, या स्पष्टीकरणाचा अहवाल अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं मारिया यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
मारिया यांनी जुलै २०१४ मध्ये लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. मोदी यांच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर ही भेट झाली. अंडरवर्ल्डकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे मोदी यांनी सांगितल्यावर मुंबईत येऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा मारिया यांनी केलाय.
भारतात परतल्यावर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांना या भेटीची माहिती आपण दिली. गोपनीय कागदपत्रांमध्ये नोंद करून एटीएसला पत्र पाठवल्याचं मारिया यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.