शपथविधीला पंतप्रधान मोदी येणार, पण बसणार कुठे?

नव्या सरकारचा शपथविधी वानखडे स्टेडीयम इथ २९ किंवा ३० तारखेला होण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी राजशिष्टाचार विभागानं तयारी सुरू केलीय. 

Updated: Oct 25, 2014, 11:24 PM IST
शपथविधीला पंतप्रधान मोदी येणार, पण बसणार कुठे? title=

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी वानखडे स्टेडीयम इथ २९ किंवा ३० तारखेला होण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी राजशिष्टाचार विभागानं तयारी सुरू केलीय. 
 
महाराष्ट्रात सत्तास्थापना करून बुधवार किंवा गुरुवारी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या ऊन खूप पडत असल्यामुळे वानखडे स्टेडीयमवर सायंकाळीच हा शपथविधी होण्याची शक्यताही वर्तवली जातेय. यासाठी भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियमही बुक केलंय. 

पण, शपथविधीला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यानं त्यांची नक्की बसण्याची व्यवस्था कुठे करायची यावर राजशिष्टाचार विभाग संभ्रमात आहेत. कारण मोदी पंतप्रधान आहेत. त्यांना शिष्टाचारानुसार स्टेजवर राज्यपाल यांच्यासमवेत बसवायचं? की प्रेक्षागारात बसवायचं? याचा अभ्यासच राजशिष्टाचार विभाग सध्या करतंय. 

दरम्यान, नितीन गडकरींची राज्यात परतण्याची इच्छा नाही, तसं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं असं आज सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपुरात नितीन गडकरींची भेट घेतली. तर केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही आज नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणणंच चुकीच आहे, असं उमा भारती यांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.