मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लातूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एक सेल्फी काढला, तो सेल्फी वादात आला, आता या सेल्फीवर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय, दुष्काळग्रस्त भागात पाणी पाहून मला आनंद झाला, राजस्थानात पाणी पाहण्यासारखं हे होतं. रविवारी मांजरा नदीवरील साई बांधावर एक खड्यात पाणी पाहून मला आनंद झाला, म्हणून मी काही फोटो घेतले, सहसा मी असं करत नाही.
मी ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात फोटो घेतला, हा काही अतिउत्साह नव्हता, पण एक समाधानाचा किरण आपल्याला दिसला म्हणून आपण फोटो काढला, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी सेल्फी ट्वीटरवर शेअर केल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियात टीका होत होती, म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे असा सेल्फी काढण्यात काय चुकीचे आहे, असा सवाल करणाऱ्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर आहेत.