पाक गझल गायक अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द, शिवसेनेचे स्पष्टीकरण

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील आणखी एक नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

Updated: Jan 27, 2016, 11:48 PM IST
पाक गझल गायक अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द, शिवसेनेचे स्पष्टीकरण title=

मुंबई : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील आणखी एक नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवार २९ जानेवारीला मुंबईत अंधेरी येथील ‘द क्लब’ या ठिकाणी गुलाम अली येणार होते. मात्र, शिवसेना चित्रपट सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजक सुहैब इल्यासी यांनी दिली आहे.

पाकिस्तानी कलाकारांना विरोधाच्या मुद्द्यावर शिवसेना अजूनही ठाम आहे. मात्र, या कार्यक्रमाप्रकरणी शिवसेनेने स्पष्टीकरण दिलेय.  याआधीही मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील गुलाम अलींचा नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रद्द करण्यात आला होता. 

शिवसेनेच्या या विरोधानंतर राजकारण चांगलेच तापले होते. मुंबईनंतर पुण्यातही गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला होता, तर शिवसेनेच्या भूमिकेचा निषेध करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गुलाम अलींना दिल्लीत कार्यक्रम घेण्याचे निमंत्रण दिले होते.